पपरी- चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन ऊर्फ गोटय़ा कुंडलिक धावडे (वय ३१) याच्या खूनप्रकरणात भोसरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अंकुश लांडगे यांच्या मुलाचाही अटक आरोपीत समावेश आहे. िपपरी न्यायालयाने या आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण १५ आरोपी निष्पन्न झाले असून, इतरांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
राहुल अंकुश लांडगे (वय २०), किशोर मधुकर साखरे (वय २१), अभिषेक शिवाजी जरे (वय २२) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. बाळा बाबासाहेब लांडगे, रवी बाबासाहेब लांडगे, प्रविण पोपट लांडगे, विकास पोपट लांडगे, किरण काटकर, अतुल काटकर, सचिन रावताळे यांच्यासह इतर काही आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, हे आरोपी फरार आहेत.गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास धावडे व त्याचे चार साथीदार धावडेच्या कार्यालयासमोर बसले होते. एका छोटय़ा टेम्पोतून हल्लेखोर आले. कोयता, तलवार व हॉकी स्टीक घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी धावडे व त्याच्या साथीदारांवर हल्ला केला. केवळ पाच ते सहा मिनिटांतच हा प्रकार करून हल्लेखोर त्याच टेम्पोतून पसार झाले. धावडेच्या डोक्यावर कोयता व तलवारीने अनेक वार करण्यात आले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांपैकी एक असलेल्या अंकुश रामदास लकडे (वय २७, रा. धावडे वस्ती, भोसरी) याचा गोळी लागून मृत्यू झाला. धावडेचा साथीदार संदीप रामचंद्र मधुरे (वय ३०, रा. आकुर्डी) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. सहा वर्षांपूर्वी अंकुश लांडगे यांची हत्या झाली होती. त्यात धावडे मुख्य आरोपी होता. या हत्येचा बदला घेण्यासाठी धावडेचा खून झाल्याचे पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर भोसरी व धावडे वस्ती भागात तणावपूर्ण शांतता आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी अद्याप इतर आरोपी फरार आहेत.
धावडे खूनप्रकरणी अंकुश लांडगे यांच्या मुलासह तिघांना अटक
पपरी- चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन ऊर्फ गोटय़ा कुंडलिक धावडे (वय ३१) याच्या खूनप्रकरणात भोसरी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. अंकुश लांडगे यांच्या मुलाचाही अटक आरोपीत समावेश आहे.
नक्की वाचा
First published on: 01-12-2012 at 04:18 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhawde murder accused ankush landge son and other three arrested