अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीस खरी रंगत आली आहे. शिरपूर, धुळे, साक्री या तालुक्यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
शिंदखेडा तालुक्यात नऊ गट आणि १८ गणांमध्ये निवडणूक होत असून, पंचायत समितीवर सध्या भाजपची सत्ता आहे. दोंडाईचा पालिकेवर माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी शिंदखेडा विधानसभा निवडणुकीत पराभव पदरी आलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी त्यांच्या पत्नी हेमांगी सनेर यांचा मेथी गटातून अर्ज दाखल केला होता. परंतु नंतर त्यांनी अर्ज मागे घेणे शहाणपणाचे समजले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर भामरे यांनीही या गटातून त्यांच्या स्नुषा श्वेता भामरे यांची उमेदवारी मागे घेतली. आता या ठिकाणी काँग्रेसच्या कविता पाटील आणि भाजपच्या वैशाली बागूल यांच्यात सरळ लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांचे पुत्र रविराज भामरे हे बहय़ाणे गटातून उमेदवारी करीत असून, त्यांच्याविरुद्ध भाजपचे तालुका अध्यक्ष कामराज ऊर्फ दिगंबर निकम हे उभे आहेत. याच गटातून विठ्ठलसिंग गिरासे यांनीही अपक्ष उमेदवारी केल्याने ही तिरंगी लढत लक्षवेधक ठरणार आहे. तालुक्यातील विरदेल गटही चर्चेत आला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा  उपप्रमुख सर्जेराव पाटील यांच्या पत्नी मीना पाटील यांच्याविरोधात काँग्रेसकडून प्रा. सुरेश देसले यांच्या पत्नी ललिता देसले िरगणात आहेत. माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या पत्नी इंदिराताई जाधव यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. तालुक्यातील विखरण, मालपूर आणि बेटावद या तीन गटांमध्ये सरळ तर, चिमठाणे, खलाणे, नरडाणा, गटांमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
िशदखेडा तालुक्यात पंचायत समितीच्या विविध गणांतील निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार, पक्ष यांच्या लढतीही रंजक आणि औत्सुक्याच्या ठरणार आहेत. बहय़ाणे गणात काँग्रेसतर्फे महेंद्र निकम असून, त्यांच्यासमोर भाजपचे जिजाबराव सोनवणे आहेत. दाऊळ गणात शिवसेनेचे भानाभाऊ कोळी यांच्यासमोर राष्ट्रवादीचे बापू सदाराव आहेत. वीरदेल गणात भाजपच्या मालती बिऱ्हाणे यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या नलिनी वेताळे यांच्यात थेट सामना आहे.