जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी थंडावला असून जिल्हा प्रशासनाने आता एक डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचे नियोजन करण्यावर भर दिला आहे.
जिल्ह्य़ातील ५६ गट आणि ११२ गणांमध्ये निवडणुकीची धामधूम सूरू आहे. जिल्ह्य़ातील चारही तालुक्यातील गट आणि कंसात गणांची संख्या पुढीलप्रमाणे- धुळे १७ गट (३४ गण), साक्री १७ (३४), शिरपूर १२ (२६), शिंदखेडा ९ (१८) धुळे तालुक्यात ४५० तर साक्री तालुक्यात ४८४ मतदान केंद्र आहेत. ही संख्या शिरपूर ३२६ व शिंदखेडा तालुक्यात ३१० अशी आहे.
जिल्ह्य़ात एक हजार ५७० मतदान केंद्रांवर १० लाख ४६ हजार ९१५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाऊ शकतील.
सर्व तालुक्यातील विविध पक्षांचे नेते, विविध गट, गणात उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त होते. शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. शनिवार हा एकच दिवस आडवा असल्याने आता साऱ्यांचे लक्ष रविवारी होणाऱ्या मतदानावर आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे.

Story img Loader