मधुमेहाच्या क्षेत्रात शिक्षक, संशोधक, विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरील माजी ज्येष्ठ सदस्य डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर औषधनिर्माण विज्ञान विभागाच्यावतीने एक दिवसीय चर्चासत्र राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सादर केले. या चर्चासत्रात डॉ. मिश्रा बोलत होते. ‘करंट रिसर्च स्ट्रॅटेजिज अ‍ॅण्ड फ्युचर प्रॉस्पेक्टस फॉर दी मॅनेजमेंट डायबेटिस मेलिटस’ या विषयावर हे चर्चासत्र नागपूर विद्यापीठाने प्रायोजित केले होते.  आंतरविद्याशाखांमध्ये समन्वयाची गरज आहे. चर्चासत्राचे समन्वयक आणि विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र गायकवाड यांनी संशोधनासंबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी चार वैज्ञानिक सत्र आणि पोस्टर सत्रही पार पडले. ‘हॅलो डायबिटिस’ या विषयावर डॉ. सुनील गुप्ता बोलले. मधुमेहावर आयुर्वेदाचा उतारा या विषयावर डॉ. घनश्याम गोडवानी यांनी मत प्रदर्शित केले. लोणावळ्याचे डॉ. सतीश भिसे यांनी मधुमेहाच्या उपचारासंबंधी भाष्य केले.
 डॉ. पी.आर. इटनकर ‘फार्माक्युटिकल्स फॉर डायबेटिस मेलिटस’ या विषयावर बोलले. त्यानंतर समारोपीय कार्यक्रमात डॉ. के.पी. भुसारी, डॉ. नरेंद्र गायकवाड, डॉ. सतिश भिसे आणि समन्वयक डॉ. पी.एस. साळवे उपस्थित होते. डॉ. पी.बी. खेडेकर, डॉ. आर.एन. वाडेत्कर, डॉ. व्ही.ए. बेलगामकर आदींनी चर्चासत्र आयोजित करण्यात सहकार्य केले.

Story img Loader