आपला लोकप्रतिनिधी जागरूक आहे की नाही हे तपासण्याचे काम जनतेचे आहे. जिल्हय़ात ३८ पुलांपकी १३ पूल आपल्या मतदारसंघात घेतले आहेत. मतदारांनी केलेले उपकार आपण विसरणार नाही, असे मत महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केले.
शिरूर तालुक्यातील वडाळी मादामपूर येथे १ कोटी २० लाख रुपये खर्चाच्या पुलाच्या कामाचे उद्घाटन धस यांच्या उपस्थितीत झाले. शिवाजी पवार, शेख महेबूब, मारोती वीर आदी उपस्थित होते. धस म्हणाले, की मंत्रालय आपल्या दारी योजनेत सभामंडपाची मागणी होती तेथे मंजुरी दिली. जिल्हय़ातील महत्त्वाचा सिंदफणा-जाटनांदूर रस्ता लवकरच करण्यात येणार आहे. अंमळनेर-भडकेल-गोमळवाडा फाटा रस्त्याची निविदा काढली आहे. रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. मतदारांनी आपल्यावर केलेले उपकार कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन नामदेव िशदे यांनी केले.

Story img Loader