प्राध्यापकांच्या संपावरून पुरोगामी विचारांच्या विद्यार्थी संघटना व अन्य विद्यार्थी संघटना यांच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. सुमारे डझनभर पुरोगामी संघटनांची आज बठक होऊन त्यांनी प्राध्यापकांच्या आंदोलनात शासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार ५ एप्रिल रोजी ऑक्युपाय कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढण्याचा निर्णय बठकीत घेण्यात आला.
प्राध्यापकांच्या संपामध्ये विद्यार्थी संघटनांची तात्त्विक भूमिका वेगवेगळी बनली आहे. त्यातून त्यांच्यात मतभेदाची दरी निर्माण झाली आहे. एनएसयूआय, राष्ट्रवादी, अभाविप, भारतीय विद्यार्थी सेना आदी विद्यार्थ्यांच्या संघटना या संपाबाबत थेट शासनाविरुध्द चकार शब्द काढत नाहीत. ते थेट प्राध्यपकांनाच लक्ष करीत आहेत असे मत पुरोगामी विद्यार्थी संघटनांचे झाले आहे. या संघटनांच्या मते प्राध्यापकांनी आंदोलनाची भूमिका शासनाला खूपच अगोदर कळविलेली होती. मात्र त्यामध्ये तोडगा काढण्यामध्ये शासनाला अपयश आले आहे. सध्याच्या गोंधळाला शासनच जबाबदार आहे. प्राध्यापकांची वेळ निश्चितपणे चुकली आहे, पण खरा दोष शासनाचा आहे. असेच पुरोगामी विद्यार्थी संघटनांचे मत आहे.
या संदर्भात मंगळवारी िबदू चौकातील माकपच्या कार्यालयात पुरोगामी विद्यार्थी संघटनांची बठक झाली. बठकीत अखिल भारतीय नवजवान सभेचे गिरीष फोंडे, शिवाजी माळी, एआयएसएफचे प्रशांत आंबी, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जयवंत पोवार, गौतम कांबळे, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे बाबासाहेब देवकर, शरद पाटील, युनिव्हर्सटिी स्टुडंट असो.चे प्रकाश नाईक, शेतकरी युवा आघाडीचे अॅड. सुरेश पाटील, विजयसिंह खरात, रिपब्लिकन यूथ फोर्सचे रमेश कांबळे आदींनी चच्रेत भाग घेतला. आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणून ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्राध्यापकांच्या संपावरून विद्यार्थी संघटनांमध्ये मतभेद
प्राध्यापकांच्या संपावरून पुरोगामी विचारांच्या विद्यार्थी संघटना व अन्य विद्यार्थी संघटना यांच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. सुमारे डझनभर पुरोगामी संघटनांची आज बठक होऊन त्यांनी प्राध्यापकांच्या आंदोलनात शासन अपयशी ठरल्याचा आरोप करीत आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार ५ एप्रिल रोजी ऑक्युपाय कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढण्याचा निर्णय बठकीत घेण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-04-2013 at 01:14 IST
TOPICSप्राध्यापक
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Differences in students union over to professors strike