टी.व्ही. आणि संगणकापासून दूर राहून मुलांनी संध्याकाळी मैदानी खेळ खेळावेत, या उद्देशाने डोंबिवलीत कार्यरत दिग्विजय कला, क्रीडावर्धिनी संस्थेच्या अग्रज्ञेय व्यायामशाळेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून कलेच्या माध्यमातून राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी संस्था दरवर्षी वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबविते. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता व्यायामशाळेच्या वतीने ध्वजवंदन केले जाते. त्याआधी नऊ वाजल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात.
स.वा. जोशी शाळेच्या प्रांगणात व्यायामशाळेचे सर्व उपक्रम राबविले जातात. येथे नऊ वर्षांवरील विद्यार्थ्यांना  बास्केट बॉलचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच विविध पारंपरिक मैदानी खेळांच्या माध्यमातून मुलांकडून व्यायाम करून घेतला जातो. आठवडय़ातील पाच दिवस संध्याकाळी सव्वासहा ते साडेआठ या वेळेत हे प्रशिक्षण वर्ग भरतात.
सध्या येथे १३० मुले प्रशिक्षण घेत आहेत. टिळक स्मृतिदिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते. अलीकडेच ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त संस्थेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मिलिंद आपटे यांनी या संस्थेची स्थापना केली. आनंद फडके हे मुख्य प्रशिक्षक म्हणून येथे कार्यरत आहेत.  

Story img Loader