‘मोना डार्लिग’, ‘मोना लूट लो सोना’ या लोकप्रिय संवादांवरून आठवण होते ती अभिनेता अजितची आणि जंजीर चित्रपटात अभिनेत्री बिंदूने साकारलेल्या ‘मोना डार्लिग’ची! ‘जंजीर’चा रिमेक केला जात असून त्यामध्ये अभिनेत्री माही गिल ही नवी मोना डार्लिग साकारतेय. परंतु, सुरुवातीला मोना डार्लिगची बिकीनीमधील व्यक्तिरेखा आपण चांगल्या प्रकारे साकारू शकू किंवा नाही याबाबत खूप साशंक होते, असे तिने म्हटलेय. यावरूनच ‘जंजीर’द्वारे बिंदूने लोकप्रिय केलेल्या मोना डार्लिग व्यक्तिरेखेची वैशिष्टय़पूर्ण नजाकत आजही अबाधित आहे असे म्हणावे लागेल.
मूळ चित्रपटातील मोना डार्लिग ही व्यक्तिरेखा अतिशय ग्लॅमरस असून बिंदूने ती अतिशय प्रभावी पद्धतीने साकारली आहे. म्हणूनच नव्याने ही भूमिका साकारताना आपण न्याय देऊ शकू किंवा नाही अशी भीती वाटत होती. या भीतीमुळे सुरुवातीला आपण मोना डार्लिग साकारण्यास नकार दिला होता, अशी प्रांजळ कबुली माहीने दिलीय.
अभिनेता अजितने साकारलेला तेजा नव्या रिमेकमध्ये प्रकाश राज साकारतोय. प्रकाश राज आणि आपली चांगली केमिस्ट्री जुळून आली असेही माहीने म्हटलेय. बिकीनी घालायची असल्यामुळे आपण थोडे का कू करीत होतो. परंतु, नव्या ‘जंजीर’मध्ये प्रेक्षकांना थोडय़ा वेगळ्या छटेची आजच्या काळाला अनसरून अशी मोना डार्लिग पाहायला मिळणार आहे. प्रकाश राजने साकारलेल्या तेजा या व्यक्तिरेखाला उद्युक्त करणारी मोना डार्लिग या नव्या रिमेकमध्ये दिसणार असली तरी ती आधुनिक बाजाची आहे, असेही माही गिलने स्पष्ट केले. बिंदूने साकारलेली मोना डार्लिग आणि आपण साकारत असलेली मोना डार्लिग वेगळी आहे हे नक्की असा दावाही माही गिलने केला. आता ‘जंजीर’च्या रिमेक पाहूनच माहीने नव्या मोना डार्लिगला न्याय दिलाय की नाही ते समजणार आहे.
जंजीर रिमेकमधील ‘मोना डार्लिग’ जरा हटके!
‘मोना डार्लिग’, ‘मोना लूट लो सोना’ या लोकप्रिय संवादांवरून आठवण होते ती अभिनेता अजितची आणि जंजीर चित्रपटात अभिनेत्री बिंदूने साकारलेल्या ‘मोना डार्लिग’ची! ‘जंजीर’चा रिमेक केला जात असून त्यामध्ये अभिनेत्री माही गिल ही नवी मोना डार्लिग साकारतेय.
First published on: 24-02-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different mona darling in remake of janjir