सध्या डिजिटल भारतचा बोलबाला चांगलाच सुरू आहे. देशातील विशेषत: शहरांतील तरुण चांगलाच तंत्रस्नेही बनला आहे. बारा ते अठरा वयोगटातील ९० टक्के विद्यार्थ्यांचे फेसबुक अकाऊंट असून अभ्यासापेक्षा मित्रांशी गप्पा मारणे ते या माध्यमातून अधिक पसंत करतात. तर ७२ टक्के विद्यार्थ्यांकडे स्वत:चा स्मार्टफोन असून त्यापैकी साठ टक्के विद्यार्थी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करतात.  टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने ‘जेन वाय’ या बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. समोरासमोर बसून संवाद साधावा अशी गरज या वयोगटातील केवळ ३६ टक्के विद्यार्थ्यांनाच वाटते. तर ४६ टक्के विद्यार्थी व्हिडीओ चॅटिंगला पसंती देतात, ५८ टक्के विद्यार्थी संदेशवहन अ‍ॅप्सना पसंती देतात. या वयातील ५५ टक्केविद्यार्थी इंटरनेटचा वापर संगणक किंवा लॅपटॉपवरून करतात. तर ३० टक्के इंटरनेटसाठी स्मार्टफोनचा वापर करतात. टीसीएसने हे सर्वेक्षण देशातील अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, कोइम्बतूर, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, कोची, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर आणि पुणे अशा १४ शहरांतील एकूण १२,३६५ शाळांतील बारा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून केले आहे.

सर्वेक्षणातील इतर ठळक नोंदी
*  ७२ टक्के विद्यार्थ्यांकडे स्वत:चा स्मार्टफोन आहे.
* घरचा संगणक, लॅपटॉपमधून इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्के
* १० पकी ७ जणांनी सध्याच्या चालू घडामोडींबाबत जागरूक राहण्यासाठी तसेच कुटुंब आणि मित्रांशी संपर्कात राहण्यासाठी समाज माध्यमांचा वापर होत असल्याचे स्पष्ट केले.
* १० पकी ९ जणांचे फेसबुक अकाऊंट्स असून त्यापकी ५२ टक्के फेसबुकवर किमान एका ग्रुपचा भाग
* ६४ टक्के विद्यार्थ्यांचे गुगल + अकाऊंट
*  ६० टक्के विद्यार्थी व्हॉट्स अ‍ॅपवर
* १० पकी ४ जण ट्विटरवर खेळाडू, सेलेब्रिटी आणि चित्रपट अभिनेते यांना फॉलो करतात
* सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी होत नसून मित्रांशी संपर्कात राहणे, कुटुंबीयांची महिती घेणे आणि चालू घडामोडींची माहिती मिळविण्यासाठी होत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले
* १० पकी ३ जण ५ मिनिटांत नोटिफिकेशनला प्रतिसाद देतात
* सरासरी ७६ टक्के जण रोज एक तास समाज माध्यमांवर घालवितात
* लेखी पोस्ट (२९ टक्के), चॅटिंग (२५टक्के), फोटो पोस्ट करणे (१४ टक्के) या तीन महत्त्वाच्या गोष्टी करणे पसंत केले जाते
* प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ४६ टक्के जण फेस टाई / स्काईप / गुगल हँगआउटचा वापर करतात.
* प्रतिसाद देणाऱ्या ५२ टक्केजणांनी ऑनलाइन वावरावर पालकांचे लक्ष असल्याचे नमूद केले.
* विकिपीडियासारख्या ऑनलाइन स्रोतांचा वापर ६३ टक्के होतो.
*  आयटी आणि इंजिनीअरिंग विद्यार्थी करिअर निवडताना इंटरनेटचा वापर करतात.

Story img Loader