आरोग्यशास्त्राच्या शिक्षणासंदर्भातील अभ्यासक्रमाविषयी े आयोजित कार्यशाळेत विद्यापीठाच्या नवनिर्वाचित विद्याशाखा मंडळांच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर हाँगकाँग येथील सेंटर फॉर एज्युकेशन अ‍ॅण्ड ट्रेनिंग या संस्थेचे प्रा. डॉ. एन. जी. पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. अरूण जामकर, दत्ता मोघे मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, डॉ. शेखर राजदेरकर, कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर उपस्थित होते. विशेष आमंत्रित आंतरराष्ट्रीय आरोग्य शिक्षण तज्ज्ञ डॉ. एन. जी. पाटील यांनी आरोग्यशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा विकास करताना सामाजिक गरजा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य समन्वय राखण्याची अपेक्षा व्यक्त केली. आरोग्यशास्त्र शिक्षणाचा अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत व सक्षम राहणे विशेष महत्वाचे असल्याचे  त्यांनी सांगितल.
कुलगुरू प्रा. डॉ. जामकर यांनी वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जात्मक वाढीबरोबर त्यांच्या विकासासाठी विद्यापीठ अनेक नवनवीन उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया यांनी वैद्यकीय शिक्षणामध्ये सुधारणा होण्याकरिता सुचविण्यात आलेल्या नवीन बाबींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली. डॉ. दिलीप गोडे यांनी आरोग्य विद्यापीठातर्फे वैद्यकीय शिक्षणाच्या विकासाकरिता राबविले जाणारे विविध उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यशाळेत वैद्यकीय शिक्षणातील मूळ तत्वे, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद, वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाची संकल्पना, मूल्यमापन, अभ्यासक्रम, नैतिकता, मूल्यांकन या विषयावरील मुद्यांवर विस्तृत माहिती देण्यात आली. व्याख्यानातून विद्यापीठाचा अभ्यासक्रम कसा असावा व त्याचे मूल्यमापन कसे करावे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे यांनी केले. डॉ. पायल बन्सल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.     

Story img Loader