पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या स्वच्छता अभियानाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नेते, बडे अधिकारी स्वच्छता करतानाचे फोटो वारंवार वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत आहेत. मात्र खरोखरीच जे ठिकाण स्वच्छ असावे यासाठी गेली अनेक वष्रे जो विविध स्तरांवरून प्रयत्न सुरू आहे त्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत फारसे कुणी उत्सुक असताना दिसत नाहीत. देशात सर्वात अस्वच्छ स्वच्छतागृहे कोलकाता येथे असून त्याखालोखाल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा क्रमांक येतो. ‘जागतिक स्वच्छता दिना’निमित्त करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
स्वच्छतागृहातील या अस्वच्छतेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विपरीत परिणाम होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही स्वच्छता हानीकारक आहेच पण याचा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या पर्यटन व्यवसायावरही होत आहे. यामुळे परदेशी पर्यटक भारताकडे वळण्यापासून दूर आहेतच पण देशी पर्यटकही आता पर्यटनाचे ठिकाण निवडताना तेथील स्वच्छतागृहांबाबत चौकशी करत असल्याचे समोर येत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार जगभरात आजही एक अब्जहून अधिक लोकांसाठी ‘स्वच्छतागृहे’ उपलब्ध नाहीत. यात भारतातील साठ लाख लोकांचा समावेश आहे. या पाश्र्वभूमीवर ‘हॉलिडेआयक्यू डॉट कॉम’ या पर्यटन क्षेत्रातील कंपनीने एक सर्वेक्षण केले. यामध्ये देशातील अस्वच्छ स्वच्छतागृहांबाबत अनेक बाबी समोर आल्या आहेत. देशातील पर्यटनाच्या ठिकाणी अनेकदा पर्यटकांना स्वच्छतागृहाची समस्या निर्माण होताना दिसते. देशात अनेक पर्यटनस्थळी सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत, तर अनेक ठिकाणी उपलब्ध असली तरी ती वापरण्यायोग्य नसतात. यामुळे स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेचा फटका पर्यटन व्यवसायाला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा