वस्त्रनगरीप्रमाणेच कलानगरी म्हणूनही इचलकरंजीचा सर्वदूर परिचय आहे. या कलानगरीतील कलाकारांच्या अंगभूत गुणांना वाव आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी शहरात कलादालनाची गरज असून त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.
शिल्पकलेचा अनोखा नमुना असलेल्या अजंठा व वेरुळ येथील शिल्पकलेच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन इचलकरंजी येथे भरविण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या पहिल्या वहिल्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी आमदार हाळवणकर बोलत होते. ही सर्व छायाचित्रे गजानन पारनाईक यांनी कॅमेराबध्द केलेली आहेत.
या वेळी आमदार हाळवणकर, माजी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांची भाषणे झाली. गजानन पारनाईक यांनी स्वागत तर प्रा. अशोक दास यांनी प्रास्ताविक केले. कलाशिक्षक सुरेंद्र दास यांनी आभार मानले. याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार संजीव देवरुखकर, रघुनाथराव जाधव, जिल्हा फोटोग्राफर असोशिएशनचे अध्यक्ष महेश बागे, जिल्हा पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, मोहन माने, अरुण सुतार, आíकटेक्चर व इंजिनिअर महेश म्हातुगडे, अमर बोंद्रे, इचलकरंजी गिरिभ्रमण संघटनेचे पदाधिकारी, इचलकरंजी फोटोग्राफर असोशिएशनचे पदाधिकारी यांच्यासह विविध शाळांतील कलाशिक्षक, मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक पारनाईक, नदीम शेख, देवानंद जानवेकर, दिलीप भस्मे, मोहन पोतदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाटय़गृह येथे हे प्रदर्शन १२ ऑक्टोबपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वासाठी पाहण्यास खुले राहणार आहे. शहर व परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ही एक पर्वणी असून या प्रदर्शनाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Story img Loader