धाबेपवनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा पायाभरणी सोहळा
जिल्ह्य़ातील काही भाग अतिशय दुर्गम आहे. या भागातील नागरिकांना अनेक अडीअडचणी आहेत. दुर्गम भागात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत आरोग्य, शिक्षण, उद्योग व रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू न देता या भागाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
सोमवारी मोरगाव-अर्जुनी तालुक्यातील धाबेपवनी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीची पायाभरणी पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आमदार राजेन्द्र जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी.िशदे, अप्पर जिल्हाधिकारी के.सी.कारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले, पंचायत समिती सभापती तानेश ताराम, उपसभापती पोमेश रामटेके, सदस्य मधुकर मरसकोल्हे, धाबेपवनीचे सरपंच शैलेन्द्र भांडारकर, रामपुरी सरपंच नरेश बुडगेवार, कोटलगाव सरपंच बळीराम मडावी, एरंडी सरपंच ताराबाई मडावी यांची उपस्थिती होती.
पटेल म्हणाले, झाशीनगर उपसा सिंचन योजना व धाबेपवनीत प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, ही मागणी बऱ्याच वर्षांंपासून करण्यात येत होती. ही इमारत लवकरच बांधून पूर्ण होईल. झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे काम डिसेंबर २०१३ अखेर पूर्ण होणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाची व्यवस्था होणार आहे. रामपुरीची रस्ता दुरुस्ती, धाबेपवनीतील मंदिर दुरुस्तीसह सध्या चिचगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तिडका व झाशीनगर ही गावे नवेगावबांध पोलीस ठाण्याला लवकरच जोडण्यात येणार आहे. केंद्र सरकारात आपला प्रतिनिधी म्हणून अनेक योजना जिल्ह्य़ासाठी आणण्यात यशस्वी झालो.
या भागातील शेतकरी हा ऊसासारख्या नगदी पिकाकडे वळला पाहिजे, यासाठी लाखांदूर येथे साखर कारखाना सुरू करण्यात आला आहे. त्याची उत्पादन क्षमता वाढविण्यात येईल. यापुढे केंद्र सरकार अनुदानाचा पसा थेट लोकांच्या खात्यात जमा करणार आहे. त्याचप्रमाणे गहू आणि तांदूळ अल्प दरात देण्यात येणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून विजय शिवणकर म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्य़ात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक रिक्त पदे त्वरित भरली पाहिजे. जिल्हा परिषद राबविण्याऱ्या विविध योजना लाभार्थीपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. धाबेपवनीचे सरपंच शैलेन्द्र भांडारकर यांनी गावच्या समस्या मांडून त्या त्वरित सोडविण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी प्रफुल्ल पटेल यांनी नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण केले.
धाबेपवनी येथील चौकात पटेल यांनी परिसरातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. प्रास्ताविक व आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.के.मेश्राम यांनी मानले. यावेळी धाबेपवनी परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
जिल्ह्य़ातील दुर्गम भागाचा विकास करणार -प्रफुल्ल पटेल
जिल्ह्य़ातील काही भाग अतिशय दुर्गम आहे. या भागातील नागरिकांना अनेक अडीअडचणी आहेत. दुर्गम भागात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत आरोग्य, शिक्षण, उद्योग व रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू न देता या भागाच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
First published on: 27-02-2013 at 03:14 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distrect backward place will developed praful patel