गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा तालुक्यातील ४ ग्रामपंचायती व कोरची तालुक्यातील ४ ग्रामपंचायती मिळून ८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे.
या निवडणूक कार्यक्रमानुसार भामरागड तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकाही घेण्यात येणार आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज मागविणे १ डिसेंबरपासून सुरू झालेले असून मतदान २३ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.००
वाजेपर्यंत घेण्यात येणार असून मतमोजणी २४ डिसेंबरला होणार आहे.
या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील निकाल जाहीर होईपर्यंत
म्हणजेच २४ डिसेंबपर्यंत आचारसंहिता अंमलता राहील.  

Story img Loader