‘लोकसत्ता यशस्वी भव’ या उपक्रमांतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगाने ठाणे वागळे इस्टेट येथील बाल विद्यामंदिर या शाळेमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना यशस्वी भव या मार्गदर्शन पुस्तिकांचे वितरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात लोकसत्ता वितरण विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मंगेश ठाकूर यांनी या उपक्रमाविषयी उपयुक्त माहिती उपस्थितांना दिली.
‘लोकसत्ता यशस्वी भव’ हा उपक्रम म्हणजे सामाजिक जाणिवेचे एक उत्तम कार्य आहे. या स्तुत्य उपक्रमामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा सहभाग असणे अभिमानास्पद वाटते, असे बँकेचे जनसंपर्क विभागाचे साहाय्यक महाव्यवस्थापक एन. एस. मुळे यांनी सांगितले. तर आदर्श शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणिवेचे भान कसे जपावे, याचे उत्तम मार्गदर्शन केले. गेली आठ वर्षे संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष बी. बी. मोरे यांच्या जयंतीनिमित्त या शाळेमध्ये हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी लोकसत्ता व स्टेट बँक ऑफ इंडियाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका विमल गोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष गावडे, संस्थेचे सदस्य श्रद्धा मोरे व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोत यांनी केले. सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा