मला कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करायला आवडते. मातीच्या पणत्या लावणे, मिठाईची देवाण-घेवाण या सगळ्या गोष्टी मला मनापासून आवडतात. मी नेहमीप्रमाणे मोठय़ा उत्साहात आणि आनंदात ही दिवाळी साजरी करणार आहे.
दिवाळीचा सण मला खूप आवडतो. आनंद आणि आश्चर्याचा जॅकपॉट म्हणजे हा सण. दिवाळीत घरी रांगोळी काढणे, पणत्या-दिवे यांनी संपूर्ण घर सजवणं हा माझा आवडता उद्योग आहे. माझ्या वडिलांनी तर मला दिवाळीची फार मोठी भेट आधीच दिली आहे त्यामुळे या दिवाळीत मी फार आनंदी आहे.
लहानपणापासून दिवाळी हा माझा आवडता सण आहे. लहानपणी दिवाळीतले फटाके मला फार आवडायचे आता कुटुंबातील सदस्य आणि भरपूर खाणं या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या झाल्या आहेत. दिवाळीचा संपूर्ण आठवडा सगळं शहर असं आकाशकंदिल आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेलं असतं. लोक दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र येतात. वर्षभर दिवाळीच्या या आठवडय़ाची मी आवर्जून वाट पहात असतो.
* सिमर ऊर्फ दीपिका सॅमसन (ससुराल सिमर का)
प्रत्येक सणाचे वैशिष्टय़ असते. जसे नाताळमध्ये सॅण्टाक्लॉज तसे दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी. फक्त कानठळ्या बसविणारे फटाके वाजविण्याऐवजी कमी आवाजाचे फटाके फोडणे मला आवडते. फुलबाज्या, अनार फोडणे चांगले. रॉकेट आणि मोठे सुतळी बॉम्ब वगैरेची तर मला खूपच भीती वाटते. रॉकेटच्या आवाजामुळे कानात ईयरप्लग लावावा लागतो. माझ्या चाहत्यांना आणि सर्व प्रेक्षकांना ही दिवाळी आनंद आणि समृद्धी देणारी जावो याच शुभेच्छा.
* प्रेम ऊर्फ शोएब मलिक (ससुराल सिमर का)
दीपावली हा माझा सगळ्या आवडता सण आहे. सहकुटूंब दीपोत्सव साजरा करणे, भरपूर मिठाई खाणे, फटाक्यांची आतषबाजी ही मजा दरवर्षी आवर्जून करतो. खरेतर मिठाई हा माझा वीकपॉईण्ट आहे.
* सिद्धी ऊर्फ कीर्ती नागपुरे (परिचय)
यंदाच्या दिवाळीत मातीच्या पणत्या लावून अख्खे घर मी सजविणार आहे. लक्ष्मीपूजन करून माझ्या कुटुंबातील सगळ्यांच्या सोबत नवीन पेहरावात दिवाळीच्या फराळाचा यथेच्छ आस्वाद घेणार आहे. दीपावलीनिमित्त कुटूंब, मित्रमंडळी यांना एकत्र येऊन मजा करण्याची संधी मिळते. त्यामुळे आपसांतील प्रेम, आपुलकी वाढते म्हणून मला दिवाळीचा सण खूप आवडतो.
* मुक्ता ऊर्फ श्रीजिता डे (उतरन)
दीपावलीचा सण जवळ आला की सुंदर रांगोळी काढण्याच्या कल्पनेने मी आतूर होते. दिवाळीत सर्वत्र दिसणारी आनंदाची दृश्ये मी रांगोळीद्वारे काढते. वेगवेगळ्या पॅटर्नच्या डिझाईन्सचीही रांगोळी काढते. त्यासाठी मी रंग बनविते. पूर्वी एकदा दिवाळी स्वागताचा संदेश मोठय़ा अक्षरात रांगोळीने काढून मित्रमंडळींचे स्वागत मी केले होते. माझ्यापुरते दिवाळी म्हणजे रांगोळी असे जणू समीकरणच आहे. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर होणारा आनंद अवर्णनीयच!
लहानपणापासून दिवाळीच्या तिन्ही दिवसांसाठी वेगवेगळे कपडे खरेदी करणे याची मला आवड आहे. दिवाळी म्हणजे खरेदी हे समीकरणच जणू. लहान असताना फक्त नवीन कपडे घ्यायचे. पण आता नवीन कपडय़ांवर शोभून दिसतील असे अलंकार, अॅक्सेसरीजही खरेदी करते. माझ्या चाहत्यांची दिवाळी आनंदात जावो.
अनेकदा दिवाळी आली की पहिल्या दिवशी घरची पूजाअर्चा आटोपली की संध्याकाळी मी आणि नीलम रात्रीचे जेवण मित्रांच्या घरी जायचो. कधी कधी कार्ड पार्टीलाही जायचो. यंदाच्या दिवाळीत कार्ड पार्टी करण्याची खूप इच्छा आहे. दीपावली म्हणजे आनंद द्विगुणित करण्याचा सण आहे. आपला आनंद इतरांशी वाटून घेऊन आनंदोत्सव साजरा करूया.
दीपावलीचा सण माझ्या घरी अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जातो. कुटुंबातील सर्वजण एकत्र असतात. लक्ष्मीपूजन पारंपरिक पद्धतीने केल्यानंतर माझी आई जेवण बनवायला घेते. सगळे घर प्रकाशमय करणारे दिवे लावून खिडक्यांवरही मिर्ची लाईट्स लावायचे काम मीच करतो. फटाक्यांमध्ये पॅराशूट हवेत सोडणे आणि वेगवेगळ्या रंगांची ही पॅराशूट्स नेमकी कोणत्या इमारतींवर जातात हे पाहण्यासाठी अक्षरश: धावत सुटणे हा प्रकार लहानपणांपासून करत आलोय. यावर्षीही अशीच दिवाळी साजरी करणार आहे.