ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, असे नेतृत्व कुठल्याही राजकीय पक्षात किंवा जाती-धर्मामध्ये असले तरी त्याकडे नकारात्मक दृष्टीने न बघता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून मदत केली पाहिजे. तरच समाजात चांगली काम करणारी माणसे तयार होतील आणि समाजाचा विकास होईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.
निर्मल उज्वल क्रेडिट को ऑप. सोसायटी लि.तर्फे दक्षिण नागपुरातील उमरेड मार्गावर उभारण्यात आलेल्या निर्मल नगरीचा हस्तांतरण सोहळा नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी निर्मलनगरीतील काही सदनिकाधारकांना चाव्या सुपूर्द करून निवासी गाळ्यांचा ताबा देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महापौर अनिल सोले, आमदार दीनानाथ पडोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, गायक स्वप्नील बांदोडकर, नगरसेवक किशोर कुमेरिया, नीता ठाकरे, बँकेचे सचिव प्रमोद मानमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. समाजात चांगले काम करणारी माणसे अनेक असताना तो कुठल्या राजकीय पक्षाचा आहे की धर्माचा याचा विचार न करता त्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. समाजात चांगली कामे करताना अनेक संकटे येत असली तरी त्यातूनही तो काम करीत असतो. मात्र काही प्रसारमाध्यमे आणि नकारात्मक दृष्टी असलेला वर्ग त्यांच्याकडे सतत आरोपी म्हणून त्यांच्याकडे पहात असतो. चांगल्या माणसाला समाजातून उद्ध्वस्त करायला काही वेळ लागत नाही मात्र आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना किती कष्ट सोसावे लागतात याचा विचार मात्र केला जात नाही, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांची भाषणे झाली. प्रमोद मानमोडे यांनी प्रास्ताविक तर संचालन माधवी पांडे यांनी केले.
निर्मल-उज्वल क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या उमरेड मार्गावरील निर्मल नगरीच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी. शेजारी महापौर अनिल सोले, आमदार विनायक मेटे, निर्मल उज्वलचे सर्वेसर्वा प्रमोद मानमोडे, गायक स्वप्नील बांदोडकर, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया आदी. (लोकसत्ता छायाचित्र)
विकासाची दृष्टी असलेल्यांकडे नकारात्मक नजरेने पाहू नका
ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, असे नेतृत्व कुठल्याही राजकीय पक्षात किंवा जाती-धर्मामध्ये असले तरी त्याकडे नकारात्मक दृष्टीने न बघता खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून मदत केली पाहिजे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-01-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not look negative who got possitive look of development