देशभरातील ३६ हजार डॉक्टरांनी १० वर्षांत सुमारे चार लाख ७० हजार मुली गर्भातच मारल्या. त्यामुळे तेदेखील दहशतवादीच ठरतात, असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्यां व ‘लेक लाडकी अभियान’च्या प्रमुख अॅड. वर्षां देशपांडे यांनी व्यक्त केले.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने कर्मवीर व्यंकटराव रणधीर व्याख्यानमालेंतर्गत येथील अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात अॅड. देशपांडे यांचे व्याख्यान झाले. मुलींची कमी होणारी संख्या आणि हिंसा या विषयावर त्यांनी विचार मांडले. हुंडा घेणाऱ्या मुलाला नकार, गर्भलिंग निदानास नकार आणि भेदभाव करण्यास नकार अर्थात सर्वाना समान न्याय हा निर्धार तरुणींनी केल्यास लोकशाही कुटुंबाची निश्चितच निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्त्रियांना शक्ती, बुद्धी व पैशाची देवता म्हणून संबोधले जात असले तरी पुरुषच शक्तिमान समजला जातो. पैशांचे व्यवहारही त्यांच्याच हातात असतात. बाईला पायातील वहाण दारी म्हणून हिणविले जाते. स्त्रियांमध्ये विधवा, परित्यक्ता, वेश्या, कुमारिका अशा भिंती पुरुषांनीच घातल्याचेही त्या म्हणाल्या. दिल्ल्तील घटना ही पुरुषी मानसिकतेतून घडली आहे. स्त्रिया सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत असताना असे काही षड्यंत्र सातत्याने घडविले जाते. शिक्षणातून नीतिमूल्य रुजविली जातात असे म्हणतात; मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांमध्ये नीतिमूल्य रुजणार नसेल तर त्या शिक्षणाचा काय फायदा, असा प्रश्न अॅड. देशपांडे यांनी उपस्थित केला.
स्त्रीभ्रूण हत्या करणारे डॉक्टर दहशतवादीच- अॅड. वर्षां देशपांडे
देशभरातील ३६ हजार डॉक्टरांनी १० वर्षांत सुमारे चार लाख ७० हजार मुली गर्भातच मारल्या. त्यामुळे तेदेखील दहशतवादीच ठरतात, असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्यां व ‘लेक लाडकी अभियान’च्या प्रमुख अॅड. वर्षां देशपांडे यांनी व्यक्त केले.
First published on: 23-01-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor abort girl child like terror