सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, त्यातूनच लोकशाहीचा पाया अधिक समृद्ध व मजबूत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियोजन भवन येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नवमतदारांना छायचित्र मतदार ओळखपत्र, बिल्ले वाटप करण्यात आले.पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, प्रांताधिकारी रविंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी अजय मोरे, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनिल माळी आदी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक ही लोकशाहीतील मुलभूत गोष्ट आहे. त्यामुळेच मतदारांच्या मताला महत्व आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. देशाने सर्वाना मतदानाचा अधिकार दिला आहे. तो बजावला गेला तरच लोकशाही मजबूत होणार आहे असे जिल्हाधिकारी म्हणाले. पोलीस अधीक्षक शिंदे यांनी मतदानाची टक्केवारी वाढायला हवी असे सांगून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान अधिक होते याकडे लक्ष वेधले. स्पर्धेतील विजेत्या प्रेरणा दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. शैलेश थोरात व अमोल बागूल यांचा यावेळी मतदान जागृती मोहिमेतील सक्रिय सहभागासाठी सत्कार करण्यात आला. माळी यांनी प्रास्तविक केले. पाटील यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा