दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मुलगी आणि आई यांना प्रेरणा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यातील सत्कारमूर्तीमध्ये पूर्वी व वर्षां भावे, सोहा आणि निना कुलकर्णी, तेजश्री आणि जागृती वालावलकर, शुभदा व माणिक वराडकर, मनस्विनी लता रविंद्र व लता प्रतिभा मधुकर, अंजली किर्तने व पद्मिनी गोविंद बिनिवाले, जान्हवी आणि ज्योती वर्तक, विद्या ठाकूर व अनुसया पदीर, तेजश्री व भारती आमोणकर, रुपाली आंबुरे व प्रतिभा खैरमोडे या ‘मुलगी आणि आई’ यांचा समावेश होता.
ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, महेश म्हात्रे, सुंदर चांद ठक्कर, प्रकाश कुलकर्णी, भरत घेलानी, ज्येष्ठ अभिनेते परिक्षित सहानी तसेच शशी जाधव, कुंदन व्यास, व्ही. के. त्रिपाठी, प्रविण त्रिपाठी या मान्यवरांच्या हस्ते ‘माय-लेकीं’चा गौरव करण्यात आला.     
११ मे रोजी जागतिक मातृदिन आहे. त्या निमित्ताने सह्याद्री वाहिनीवर दुपारी साडेतीन वाजता प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्याचा वृत्तान्त प्रसारित केला जाणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा