दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’वाहिनीवरील ‘अमृतवेल’ या साहित्यविषयक कार्यक्रमात येत्या १७ डिसेंबर रोजी ‘लेखक भेट’ या अंतर्गत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. डॉ. मुणगेकर यांनी लिहिलेल्या ‘मी असा घडलो’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने ही मुलाखत होणार असून रवीराज गंधे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम १७ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होणार आहे. रविवार, २३ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम पुन्हा प्रक्षेपित केला जाणार आहे.   

Story img Loader