जालनाकडून भरधाव वेगाने बुलढाण्याकडे जाणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक लागून गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चिखली येथील डॉ. अभिषेक चांडगे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे वडील प्रमोद चांडगे जखमी झाले . त्यांना औरंगाबादला हलविले आहे. हा अपघात सकाळी ७ च्या सुमारास येथील खामगाव चौफुलीवर घडला. जालन्याकडून कंटेनर (क्र. एच.आर. ३८/क्यू. ४३८७) भरधाव वेगाने बुलढाण्याकडे जात असतांना येथील खामगाव चौफुलीवर चिखली येथे दुचाकीवरून जाणाऱ्या डॉ. अभिषेक चांडगे (३०) व त्यांचे वडील प्रमोद चांडगे (६०) यांना कंटेनरने जबर धडक दिली. अपघातानंतर या दोघांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना औरंगाबादला नेत असतांना रस्त्यातच डॉ. चांडगे यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी फरार चालकाविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पुढील तपास ठाणेदार डी.बी.तडवी आणि गवई करीत आहेत.
अपघातात डॉ.चांडगे ठार, वडील जखमी
जालनाकडून भरधाव वेगाने बुलढाण्याकडे जाणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक लागून गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चिखली येथील डॉ. अभिषेक चांडगे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे वडील प्रमोद चांडगे जखमी झाले .
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-01-2013 at 01:39 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr chandge killed father injured in accident