शहरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात खुच्र्या लावण्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीतून उघड झाले आहे. या प्रकरणात जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंत्यावर कारवाई करावी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जनमंचने केली आहे.
डॉ. देशपांडे सभागृहामध्ये तुटलेल्या खुच्र्या लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी २६ नोव्हेंबर २०१२ रोजी गांधीनगरातील एस.एस. कन्स्ट्रक्शनला कंत्राट दिले होते. कंत्राटाप्रमाणे एका खुर्चीचा दर ११ हजार ८०० रुपये एवढा मंजूर करण्यात आला. कंत्राटदाराने करारनाम्यात दिलेल्या अटीप्रमाणे नवीन खुच्या बसवणे आवश्यक होते. परंतु एस.एस. कन्स्ट्रक्शनने  ६ हजार २०० रुपये प्रति खुच्र्या बसवण्याचे कंत्राट सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू, आर्य समाज कॉम्प्लेक्स येथील व्यंकटेश इंडस्ट्रीजला दिले. कंत्राटाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त १४८ मोडलेल्या खुच्र्या असल्याचे सांगितले होते. यावरून असे दिसते की, ४०० खुच्र्या तुटलेल्या नसताना जाणीवपूर्वक नवीन ४०० खुच्र्या लावण्याचे कंत्राट मंजूर केले. यासाठी नवीन खुच्र्या बसवण्यासाठी ४२ लाख, ५५ हजार ५५२ रुपयांचे देयक देण्यात आले.
४०० खुच्र्या बसविण्यात आल्याची कागदपत्रे तयार करण्यात आली. सी.एस.आर.प्रमाणे एका खुर्चीची किंमत १४ हजार, ५६८ रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात आली.
प्रत्यक्षात त्याच नमुन्याची खुर्ची ६ हजार, २०० रुपयात बसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. यामुळे सी.एस.आर.द्वारे मंजूर करण्यात आलेल्या दराबाबत शंका येते.

Story img Loader