कृषी पंपांच्या वाढीव वीजबिलाविरुद्ध सुरू असताना अंशत: बिल शेतकरी भरत आहेत मात्र, ते न स्वीकारता वीज वितरण कंपनी वीज जोडणी तोडण्याची भीती घालत आहे. हा प्रकार शेतकरी सहन करणार नाहीत. वीज तोडायला येणाऱ्या हातांना अडवू, वीज तोडाल तर याद राखा असा इशारा महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला.
महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनच्या पुढाकाराने सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या कृषी पंपांची वीजबिले शासन सवलतीच्या दरात भरून घ्यावी. तसेच वीज बिलावरील पोकळ थकबाकी कमी करावी या मागणीसाठी एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना मागण्याचे निवेदन देतेवेळी त्यांनी भूमिका मांडली. कृषीपंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना ऑक्टोबर २०१२ मध्ये जादा दराने म्हणजे ७२ पैसे प्रति युनिट, डिमांड चार्ज, इंधन अधिभार व इतर आकारणीसह बिले पाठवली आहेत. ती पूर्णपणे चुकीची आणि शेती व्यवसायाला अडचणीत आणणारी आहेत. ही वाढ एकतर्फी असून, ती करताना शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना विचारात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे ही दरवाढ रद्द करावी. या प्रश्नी आम्ही आंदोलन करून शासनाशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, तोपर्यंत वीज वितरण कंपनी कनेक्शन तोडण्याची धमकी देत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करावा. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कंपनीने सहकार्याची भूमिका घ्यावी असे एन. डी. पाटील यांनी सांगितले. बाबासाहेब पाटील-भुयेकर, रत्नाकर तांबे, सयाजीराव पाटील, भीमराव घोरपडे सहभागी होते.
शेतीची वीज तोडाल तर याद राखा – एन. डी. पाटील
कृषी पंपांच्या वाढीव वीजबिलाविरुद्ध सुरू असताना अंशत: बिल शेतकरी भरत आहेत मात्र, ते न स्वीकारता वीज वितरण कंपनी वीज जोडणी तोडण्याची भीती घालत आहे. हा प्रकार शेतकरी सहन करणार नाहीत. वीज तोडायला येणाऱ्या हातांना अडवू, वीज तोडाल तर याद राखा असा इशारा महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला.
First published on: 10-01-2013 at 09:22 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr n d patil warned mseb