डॉ. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प, गोंड आदिवासींसाठी उभारलेले कार्य, हेमलकसा येथील निसर्ग, प्रकाश आमटे यांच्या पत्नी मंदा आमटे यांनी जोडीदाराच्या मदतीने उभारलेल्या या प्रकल्पासाठी उपसलेले कष्ट हे सारे समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे.. द रीअल हीरो’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकर डॉ. प्रकाश आमटे यांची भूमिका साकारत असून सोनाली कुलकर्णी मंदाताईंची भूमिका साकारत आहे. परंतु, विदर्भ परिसरातील भाषेचा लहेजा आणि गोंड आदिवासींची भाषा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिग्दर्शिकेने २०० गोंड आदिवासी कलावंतांनाही चित्रपटात भूमिका दिल्या आहेत.
हेमलकसा येथे अलीकडचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. सोनाली कुलकर्णी आपल्या लहान बाळासह हेमलकसामध्ये मंदाताईंच्या सान्निध्यात राहण्यासाठी गेली. तिथे मंदाताईंचे वागणे-बोलणे, त्यांची कामाची पद्धत पाहणे, त्यांचे निरीक्षण करणे यातून भूमिका जिवंत करण्याचा प्रयत्न तिने केला आहे. डॉ. मोहन आगाशे या चित्रपटात बाबा आमटे यांची भूमिका करीत आहेत. मंदाताईंची तरुणपणीतील व्यक्तिरेखा तेजश्री प्रधान करीत आहे.
वाघ, सिंह, अस्वल, अजगर, हरीण अशा कित्येक प्राण्यांसह सहजीवन जगणारे आमटे दाम्पत्य, त्यांची दैनंदिन जीवनशैली, त्यांची काम करण्याची पद्धत हे सगळेच अनोखे, जगावेगळे. हे अनोखं विश्व लोकांसमोर आणण्याच्या उद्दिष्टाने चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचे निर्मात्या-दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोरे यांनी सांगितले. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांत हा चित्रपट केला जाणार आहे.
‘डॉ. प्रकाश बाबा आमटे .. द रीअल हीरो’मध्ये
डॉ. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प, गोंड आदिवासींसाठी उभारलेले कार्य, हेमलकसा येथील निसर्ग, प्रकाश आमटे यांच्या पत्नी मंदा आमटे यांनी जोडीदाराच्या मदतीने उभारलेल्या या प्रकल्पासाठी उपसलेले कष्ट हे सारे समृद्धी पोरे दिग्दर्शित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे.. द रीअल हीरो’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा
First published on: 17-03-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr prakash baba amte in the real hero