दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘एनसीसी’च्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात उत्कृष्ट कामगिरी पार पाडल्याबद्दल सहयोगी एनसीसी अधिकारी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा यांना अमृतसरचे कॅम्प कमांडंट कर्नल आर.एस.बाथ यांनी उत्कृष्ट ‘कॅम्प अॅडज्युटंट’ म्हणून ट्रॉफी व विशेष प्रशंसा पत्र देवून गौरविले आहे. तर एनसीसी (महाराष्ट्र) चे उपमहानिदेशक ब्रिगेडिअर आर. एस. ग्रेवाल यांनी शहा यांचे महाराष्ट्राला पंतप्रधान ध्वजाचा सन्मान मिळवून देण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचे एका पत्राव्दारे कौतुक केले आहे.
दिल्ली येथे प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व एनसीसीच्या कोल्हापूर गट मुख्यालयाच्या अखत्यारितील विविध बटालियन्समधील २० छात्रसैनिकांनी केले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असलेल्या या पथकाबरोबर ‘काँटिजन्ट कमांडर’ म्हणून मेजर प्रा. डॉ. शहा यांना आवर्जून पाठविण्यात आले होते. यामुळे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत आणखीएक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
डॉ. रूपा शहा यांचा गौरव
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘एनसीसी’च्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात उत्कृष्ट कामगिरी पार पाडल्याबद्दल सहयोगी एनसीसी अधिकारी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा यांना अमृतसरचे कॅम्प कमांडंट कर्नल आर.एस.बाथ यांनी उत्कृष्ट ‘कॅम्प अॅडज्युटंट’ म्हणून ट्रॉफी व विशेष प्रशंसा पत्र देवून गौरविले आहे. तर एनसीसी (महाराष्ट्र) चे उपमहानिदेशक ब्रिगेडिअर आर. एस. ग्रेवाल यांनी शहा यांचे महाराष्ट्राला पंतप्रधान ध्वजाचा सन्मान मिळवून देण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचे एका पत्राव्दारे कौतुक केले आहे.
आणखी वाचा
First published on: 08-02-2013 at 07:39 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr rupa shah honoured by camp comm cournel