स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीतील योगदानाबद्धल नेत्रतज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांचा ग्रीस मधील विद्यापीठात गौरव करण्यात आला. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात डॉ. कांकरिया यांनी या चळवळीबाबत भारतात सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.
युनिव्र्हसिटी ऑफ माउंटन्स ग्रीस मधील विद्यापीठाने एका विशेष परिषदेचे आयोजन नुकतेच केले होते. त्यात डॉ. कांकरिया यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्रीमती पॅलिकॅरीस या परिषदेच्या निमंत्रक होत्या. डॉ. कांकरिया यांनी या परिषदेत सेव्ह गर्ल चाईल्ड या विषयावर आपले विचार व्यक्त केले. या विषयावर स्वत: तयार केलेल्या
११ कलमी कार्यक्रमाबाबत स्लाईड शो च्या सहायाने त्यांनी माहिती दिली. संयोजिका श्रीमती पॅलिकॅरिस यांनी प्रास्तविक केले.
महात्मा गांधी यांच्या अहिंसा या तत्वाशी सांगड घालत डॉ. कांकरिया यांनी ज्यावेळी आईच्या उदरातून बोलणाऱ्या एका चिमुकलीचे मनोगत भावपुर्ण शब्दात सादर केल्या त्यावेळी उपस्थितांनी उभे राहून त्यांना दाद दिली. स्थानिक वृत्तपत्रांमधून या विषयावर डॉ. कांकरिया यांच्या मुलाखतीही प्रसिद्ध झाल्या. तेथील काही महाविद्यालयीन युवतींसमोरही डॉ. कांकरिया यांनी या विषयावर व्याख्यान दिले.