शहरातील नालेसफाईचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी ७ जूनपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचना महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सोमवारी केली.
यापूर्वी नालेसफाईचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करावे, असे कळविले होते. मात्र, कर्मचाऱ्यांनी वेळकाढूपणा केल्याने शहर अभियंत्यांना काम संपविण्याबाबत कडक निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील ६० पेक्षा अधिक भागांत नालेसफाई केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांत केवळ ३५ टक्के काम झाल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. शहरातील नालेसफाईची कामे १०-१५ दिवसांत होऊ शकत नाहीत, असे निवृत्त कर्मचारी सांगतात. नालेसफाई व्यवस्थित करायची असेल तर किमान दोन महिने लागतात. प्लास्टिक व कचरा फेकल्याने नाल्यांमधील गाळ वाढतो. तो काढण्यास तांत्रिक साह्य़ घ्यावे लागते. गेल्या काही दिवसांपासून हे काम होत नव्हते. सोमवारी डॉ. कांबळे यांनी या अनुषंगाने विशेष बैठक घेतली. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा