छताचा सिमेंटचा थर कोसळून दोन महिला किरकोळ जखमी झाल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास येथे जिल्हा व सत्र न्यायालयात घडला. या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ उडाला. जखमी महिलांना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारार्थ हलविण्यात आले.

न्यायालयातील बाररूममध्ये या महिला बसल्या होत्या. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक छतावरचा सिमेंट काँक्रीटचा थर कोसळला. या वेळी तेथे या दोन महिला व अन्य काही लोक बसले होते. छताचा थर अंगावर कोसळून या दोन महिला जखमी झाल्या.

रंजना म्हस्के (वय ३०) व रूपाली मुळे (वय ३३, एन ७, औरंगाबाद) अशी जखमी महिलांची नावे आहेत. त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात हलविण्यात आले. दुपारी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितांची पळापळ झाली.

 

Story img Loader