ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्यावतीने शनिवारी दुपारी बारा वाजता डीटीएड पदविकाधारकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालयासमोरील हुतात्मा स्मारकात हा मेळावा होईल. गेल्या दोन वर्षांपासून डीटीएड पदविकाधारकांची सीईटी परीक्षा झालेली नाही. दरवर्षी एक लाखाहून अधिक विद्यार्थी ही पदविका घेऊन उत्तीर्ण होतात. त्याचप्रमाणे तितक्याच संख्येने प्रत्येक वर्षी नवीन प्रवेश होत आहेत. यामुळे राज्यात हे शिक्षण घेणारे  मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. शासनाने २०१० पासून शिक्षक पदाकरिता भरतीपूर्व परीक्षाच घेतलेली नाही.
या विरोधात डीटीएडचे विद्यार्थी एकत्रित ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनतर्फे प्रमुख जिल्ह्यात आंदोलने करून सीईटी घेण्याची मागणी करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे आरती बर्वे, भाग्यश्री बोरसे व राहुल खेळकर यांनी म्हटले आहे. डीटीएड् पदविकाधारकांच्या मेळाव्यात संघटनेचे राज्याध्यक्ष संजय नागरे, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे सचिव प्रा. डॉ. मिलिंद वाघ, आयटकचे सचिव राजू देसले हे मार्गदर्शन करणार आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ९७६६८६८२७०, ७७०९२५४९१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Story img Loader