प्रगत तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले परंतु, माणसे दूर जाऊ लागली. घरात सुखवस्तू येऊ लागल्या आहेत. परंतु वयस्कर माणसे वृद्धाश्रमात जाऊ लागली आहेत. प्रेमाचा ओलावा हा फेसबुकमध्ये नाही तर घरातील नात्यांमध्ये आहे, हे आधुनिक कुटुंब प्रमुखाला सांगावे लागत आहे, ही खेदजनक बाब असल्याची खंत कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी व्यक्त केली.
येथील जे. के. गुजर मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे बनवडी (ता. कराड) येथे आयोजित श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. अजय देशमुख यांची या वेळी उपस्थिती होती.
मितेश घट्टे म्हणाले, समाजात बरेच तरुण व्यसनाच्या आहारी जाऊ लागेल आहेत. त्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू लागली आहेत. त्यांना संस्कृतीचा आणि छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचा विसर पडत चालला आहे. तरुणांनी इतिहासातून बोध घेतला पाहिजे. त्या काळी स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय तरुणांपुढे होते. परंतु आज कोणते ध्येय आपल्या पुढे आहे याचा विचार तरुणांनी केला पाहिजे. श्रमसंस्कार शिबिरातून समाजासाठी काहीतरी करण्यासाठी संधी मिळते त्यामुळे श्रमसंस्कर शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले परंतु माणसे दूर गेली – घट्टे
प्रगत तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले परंतु, माणसे दूर जाऊ लागली. घरात सुखवस्तू येऊ लागल्या आहेत. परंतु वयस्कर माणसे वृद्धाश्रमात जाऊ लागली आहेत. प्रेमाचा ओलावा हा फेसबुकमध्ये नाही तर घरातील नात्यांमध्ये आहे, हे आधुनिक कुटुंब प्रमुखाला सांगावे लागत आहे, ही खेदजनक बाब असल्याची खंत कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी व्यक्त केली.
आणखी वाचा
First published on: 07-02-2013 at 08:08 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to technology not the man but world has came nearer ghatte