प्रवेश परीक्षेला ‘डमी’ बसवून गैरमार्गाने वांद्रे येथील ‘एन. एम. इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (एनएमआयएमएस) या संस्थेची एमबीए ही व्यवस्थापन अभ्यासक्रमविषयक पदवी हस्तगत करणाऱ्या २२ उमेदवारांना लवकरच आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. संस्थेतून २०१२ मध्ये उत्तीर्ण झालेले हे २२ उमेदवार विविध कंपन्यांमध्ये स्थिरस्थावर झाले आहेत. या कंपन्यांना पत्र पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना संस्थेने केली आहे.
या संस्थेच्या ‘एनमॅट’ या ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या सीईटीला डमी उमेदवार बसवून प्रवेश देणारे रॅकेट पोलिसांच्या गुन्हे शाखेने संस्थेच्या मदतीने उघडकीस आणले. या रॅकेटच्या माध्यमातून या वर्षी तब्बल ६१ उमेदवार प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाले होते. पण, मुलाखतीच्या टप्प्यावर या उमेदवारांचे पितळ उघडे पडल्याने संस्थेला संशय आला. त्यांनी ऑनलाईन प्रवेश देताना काढण्यात आलेल्या छायाचित्रांशी या उमेदवारांचे छायाचित्रे पडताळून पाहिली असता ती जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण मुळापासून खणून काढल्यानंतर डमी बसवून प्रवेश मिळवून देणारे हे रॅकेट उघडकीस आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा