डमी विद्यार्थी पुरवून परीक्षेत उत्तीर्ण करून देणाऱ्या ‘रॅकेट’ चा तपास करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी विद्यापीठातील परीक्षा विभागात चौकशी केली. या रॅकेटमध्ये विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांचा हात असल्याची माहिती मिळाल्याने त्याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी ही चौकशी केल्याचे समजते. पुणे पोलिसांनी गेल्याच आठवडय़ात याबाबतचे रॅकेट उघडकीस आणले. त्यात विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी विद्यार्थी पुरविणाऱ्या गौस शब्बीर शेख (वय ४०, रा. न्यू मोदीखाना, लष्कर) आणि फरीद परवेझ सय्यद (वय २३, रा. मिठानगर, कोंढवा) या दोघांना अटक करण्यात आली होती. गौस याच्याकडून वेगवेगळ्या महाविद्यालयाची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, बनावट हॉलतिकीट, फोटो आणि १४ मोबाईल जप्त करण्यात आले होते. तो पैसे घेऊन मुलांना उत्तीर्ण करून देत असल्याची माहिती समजली होती. त्याचा तपास करत असताना त्याचे संबंध विद्यापीठातील व्यक्तींशी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अशा काही व्यक्तींची माहिती त्यांना समजली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी सोमवारी विद्यापीठात चौकशी केल्याचे
समजते.
डमी विद्यार्थी पुरविणाऱ्या रॅकेटसंबंधी पोलिसांकडून विद्यापीठात चौकशी
डमी विद्यार्थी पुरवून परीक्षेत उत्तीर्ण करून देणाऱ्या ‘रॅकेट’ चा तपास करणाऱ्या पोलिसांनी सोमवारी विद्यापीठातील परीक्षा विभागात चौकशी केली.
First published on: 16-10-2012 at 06:02 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dumy student racket related information police will collect from the university