दागदागिने परिधान करून विवाह समारंभावरून परतणाऱ्या एका दाम्पत्याचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने लुटून तोतया पोलिसांनी पोबारा केला. ही घटना अंधेरी पूर्व येथील गुंदवली परिसरात घडली.
वडाळा येथील विवाह समारंभावरून प्रभाकर लोटणकर आपल्या पत्नीसह अंधेरी येथील आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी निघाले होते. अंधेरीतील गुंदवली परिसरात पोहोचले असताना लोटणकर दाम्पत्याला दोन जणांना पोलीस असल्याचे सांगून थांबवले. हल्ली सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट झाला असून तुमच्याकडील मौल्यवान दागिने बॅगेत ठेवा दोन तोतया पोलिसांनी त्यांना सांगितले. त्यानुसार बॅगेत ठेवतानाच त्या दोघांनी प्रभाकर लोटणकर यांना बोलण्यात गुंग ठेवले आणि तितक्यात दुसऱ्या तोतया पोलिसाने बॅगेत ठेवलेले दागिने अलगद काढून घेतले. दागिने घालून पायी फिरत जाऊ नका, असे सांगून ते दोघे निघून गेले. काही अंतरापर्यंत गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर लोटणकर यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेली हकिगत पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
तोतया पोलिसांनी लुटले दोन लाखांचे दागिने
दागदागिने परिधान करून विवाह समारंभावरून परतणाऱ्या एका दाम्पत्याचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने लुटून तोतया पोलिसांनी पोबारा केला. ही घटना अंधेरी पूर्व येथील गुंदवली परिसरात घडली. वडाळा येथील विवाह समारंभावरून प्रभाकर लोटणकर आपल्या पत्नीसह अंधेरी येथील आपल्या
First published on: 11-01-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Duplicate police robbers robbery of two lakhs gold