नवीन संदर्भ घेऊन लिहलेले आणि दिव, दमण, गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक इतिहासावर प्रकाश टाकणारे सदाशिव टेटविलकर यांचे ‘दुर्गलेणी-दिव दमण गोवा’ हे पुस्तक पर्यटकांसाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे माजी इतिहास विभागप्रमुख प्रा. जे. व्ही. नाईक यांनी ठाणे येथे केले.
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांच्या ‘दुर्गलेणी-दीव दमण गोवा’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अलीकडेच येथील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी नाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ.रवींद्र रामदास, ज्येष्ठ लेखक वि.ह.भूमकर, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष मा.य.गोखले आणि महापौर हरिशचंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.
पुस्तकाचे लिखाण हे सोप्या भाषेत करण्यात आले आहे. तसेच इतिहासाचे पुनर्लेखन करताना जुन्या चुका दुर करण्यात आल्याने या पुस्तकास वेगळे महत्व प्राप्त झाल्याचे नाईक यांनी सांगितले. दीव, दमण, गोवा या भागांमधील किल्ले, देऊळ आणि चर्च यांची तपशीलवार माहिती या पुस्तकात उपलब्ध असल्याने यास वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. तसेच भागांना भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या लक्षात घेता इंग्रजी भाषेतही हे पुस्तक प्रकाशित केले जावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यावेळी डॉ. दाऊद दळवी, ज्येष्ठ लेखक वि. ह.भुमकर, इतिहास तज्ञ डॉ. रवींद्र रामदास यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कोंडे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा