अकोला येथील राजस्थानी सेवा संघ आणि मारवाडी युवा मंचाच्यावतीने ‘मारवाडी एक्सप्रेस’द्वारे द्वारकाधाम गुजरात दर्शन यात्रा ७ ते १३ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा ७ जानेवारीला, सोमवारी सकाळी ८ वाजता अकोला येथून रवाना होणार आहे.
ही विशेष गाडी द्वारका, बेटद्वारका, माऊंट अबू, सोमनाथ, अहमदाबाद, अक्षरधाम असे गुजरात दर्शन करून १३ जानेवारीला अकोल्यात परत येऊल. या यात्रेत भोजन व निवास व्यवस्थेसोबतच आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष गाडीच्या माध्यमातून मारवाडी समाजाचे ११०० लोक सामाजिक एकतेचा परिचय देतील. या यात्रेची अधिक माहिती तसेच सहयोग निधीसाठी मनोज मोर (९४२२९२०५४३) किंवा कल्पेश खंडेलवाल (९४२२१६४१९०) यांच्याशी संपर्क साधावा, अशी सूचना महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाचे अकोला जिल्हा अधयक्ष प्रदीप मेहाडिया यांनी केली आहे.

Story img Loader