सध्याचा जमाना माहिती-तंत्रज्ञानाचा असून संगणक, स्मार्ट भ्रमणध्वनी, इंटरनेट, ऑनलाइन हे परवलीचे शब्द झाले आहेत. बदलत्या काळानुरूप नाटय़ क्षेत्रातही नवे बदल होत आहेत. ‘अस्तित्व’ आणि ‘मुंबई थिएटर गाइड’ यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या लेखकांचा शोध घेण्यासाठी ऑनलाइन एकांकिका संहितालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी, हिंदूी, इंग्रजी आणि गुजराती भाषेतील एकांकिका या स्पर्धेत सादर झाल्या. स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त विजेत्या सहा एकांकिका ‘स्विफ्ट बुक्स’ या आंतराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने ई-बुक स्वरूपात प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे या एकांकिका जागतिक पातळीवर नाटय़ रसिकांपर्यंत पोहोचल्या आहेत.
‘ई-नाटय़संहिता’ एकांकिका स्पर्धेत योगेश सोमण यांची ‘अॅक्ट’ ही एकांकिका मराठी भाषेत सवरेत्कृष्ट ठरली. मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषेतील एकांकिकांचा यात समावेश होता. परीक्षकांतर्फे विशेष सन्मान म्हणून आरती म्हसकर लिखित ‘मंगळसूत्र’ या मराठी भाषेतील एकांकिकेची निवड करण्यात आली. गुजराती भाषेतील सेजल पोंडा यांची ‘स्पेल बाऊंड’, इंग्रजी भाषेतील मंजिमा चॅटर्जी लिखित ‘टु मेन अॅण्ड ट्री’ तसेच विभा राणी लिखित ‘मंटो इस्मत दोस्त दुश्मन’ या एकांकिका सवरेत्कृष्ट ठरल्या.
स्पर्धेसाठी एकूण ८२ प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील ७२ प्रवेशिका ग्राह्य़ा ठरल्या. यातील ३० एकांकिका उपान्त्य फेरीत दाखल झाल्या. यातून अंतिम फेरीसाठी सहा एकांकिकांचा विचार करण्यात आला. ऑनलाइन एकांकिका स्पर्धेसाठी हंगेरी, लंडन, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूयॉर्क, मॉरिशसह भारतातून छत्तीसगढ, कोलकाता, इंदूर, बंगलोर, गाझियाबाद, दिल्ली, लखनौ, मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर येथून एकांकिका सादर झाल्या होत्या.
रामू रामनाथन, अशोक शाह, अरविंद गोडबोले यांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांतर्फे विशेष सन्मान म्हणून अनुश्रुत अग्रवाल लिखित ‘ललिता’ एकांकिकेची निवड करण्यात आली. संस्थेतर्फे यापूर्वी ई-नाटय़शोध, नाटय़कट्टा, ई-नाटय़चौपाल आदी उपक्रम राबविण्यात आले होते. सहा एकांकिकांचे हे ‘ई-बुक’ मर्यादित कालावधीसाठी ६६६.२६्रऋ३ु७.ूे या लिंकवर उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा