डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपासासाठी पोलीस पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. या प्रकरणाचाही उलगडा लवकरच होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
मलकापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आलेले गृहराज्यमंत्री पाटील पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत महिला छायाचित्रकाराबाबत घडलेली घटना निंदनीय असून, या प्रकरणाच्या तपासालाही गती मिळाली आहे. महिला पत्रकार व छायाचित्रकारांना संरक्षण देण्यात येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येविषयी ते म्हणाले, तपासासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामार्फत नवीन माहिती पुढे येत आहे. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात येऊन तपास गोपनीयरीत्या सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल.

Story img Loader