मुस्लीम समाजातील शैक्षणिक व आíथक मागासलेपण दूर झाल्याशिवाय भारत देश महासत्ता बनणार नाही, असे विचार पुणे येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त अब्दुर रहेमान यांनी आर्णी येथे आयोजित ‘शिक्षण आणि मुस्लीम समाज’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त केले.
सच्चर समिती, रंगनाथ मिश्रा आयोग आदी अहवाल प्राप्त झाले असताना सुध्दा त्याची अंमलबजावणी न झाल्याने मुस्लीम समाज आजही मुख्य प्रवाहापासुन दूर आहे त्या बाबत समाजातील घटकानी तसेच राजकारणात असणाऱ्या व्यक्तीने पुढाकार घेण्याची व चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे रहेमान म्हणाले. शासनासमोर अनेक प्रश्न उभे ठाकल्याने अपेक्षा ठेवणे मला तरी योग्य वाटत नाही.
त्यागाची भावना जोपासून कार्य केल्यास त्याचे फळ मिळू शकेल. चिकाटी व जिद्द समाजामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. परिसंवादाचे मुख्य आयोजक आमदार ख्वॉजा बेग यांचे त्यांनी अभिनंदन केले.
परिसंवादाचे उदघाटन जिल्हाधिकारी राहुल रंजनमहीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी सुध्दा शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विदर्भातील वऱ्हाडी कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग व अमरावतीचे उपजिल्हाधिकारी श्यामकांत मस्के, नानाभाऊ गाडबले यांनी सुध्दा मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आíथक व सामाजिक विषयावर मार्गदशन केले. दुसऱ्या सत्रात नागपूर येथील विधिज्ञ फिरदोश मिर्झा, साहित्यिक अजीम नवाज राही, उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सुद्धा मुस्लीम समाज आणि शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जावेद पटेल, एजाज जोश, अफजल बेग, डॉ. शब्बीर शेख, डॉ जावेद सौदागर, अ‍ॅड. तावीर, शफायत खान, रियाज पठाण, रहमान खान, हफीब खान, प्रकाश धोका, शेख रन्नु औरंगाबादे, ख्वाजा कुरेशी, राहुल रिठेच्या आईवडिलांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकामधून आमदार ख्वाजा बेग यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. संचालन मौ. सलीम यांनी केले. परिसंवादाला विदर्भातून मोठया संख्येने मुस्लीम बाधंव उपस्थित होते.