ज्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, त्यांनी तत्काळ प्रवेश प्रक्रिया थांबवावी, असे आदेश शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी शाळांना दिले आहेत. त्यामुळे प्रवेश शाळा आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील अनेक शाळांनी त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शाळांनी १५ ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये प्रवेश प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक शाळांनी या नियमाचे उल्लंघन करून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहेत. शाळांना प्रवेश प्रक्रिया न करण्याबाबत अनेक वेळा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया एप्रिल महिन्यात करावी असे स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत. अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा वगळता कोणत्याही शाळेला एप्रिलशिवाय प्रवेश प्रक्रिया राबवता येणार नाही. आता पर्यंत या संदर्भात कारवाई करता येणे शक्य नव्हते. मात्र, आता शिक्षण हक्क कायद्यानुसार या शाळांवर कारवाई करण्यात येणार नसल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले आहे. ज्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, त्या शाळांमध्ये रांगा, मुलाखती अशा सर्व सोपस्कारानंतर आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला म्हणून नि:श्वास सोडणाऱ्या पालकांमध्ये मात्र  शिक्षण संचालकांच्या आदेशामुळे अस्वस्थता पसरली आहे.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा