स्वातंत्र्यदिनी मंडळाचा वर्धापन दिन साजरा
ठाणे येथील विद्यादान सहाय्यक मंडळाचा पाचवा वर्धापनदिन सोहळा नौपाडय़ातील सहयोग मंदीर हॉलमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला असून यंदाच्या वर्षी मंडळाने ११० विद्यार्थ्यांना मदत करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थिकदृष्टय़ा गरीब असणाऱ्या हुशार मुलांना उच्च शिक्षणासाठी संस्था मदत तसेच मार्गदर्शन करते. ‘लोकसत्ता’मधील एका बातमीपासून प्रेरणा घेऊन या संस्थेची स्थापना झाली आहे. यंदा कार्यकर्त्यांसाठी दोन कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी दोन व्यक्तीमत्व विकास शिबीर आणि एक व्यवसाय मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमात विद्याथ्र्र्याची मनोगते तसेच बक्षिस समारंभ झाला. सत्यजित शहा यांनी विद्यादानवर केलेल्या कवितेचे वाचन केले. तसेच वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्व सांगणारे पथनाटय़ पाच मुली आणि चार मुलांनी सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे रेणू दाडेकर याची मुलाखत गीता शहा यांनी घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा