हरयाणाच्या शिक्षणमंत्री गीता बुक्कल यांनी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास राळेगणसिद्घीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बुक्कल त्यांच्या कुटुंबीयांसमवेत हजारे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. हरयाणामधील शालेय शिक्षणाबाबत बुक्कल यांनी हजारे यांना माहिती दिली. राज्याच्या प्रत्येक शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. हरयाणाच्या शिक्षणपद्घतीवर हजारे यांनी समाधान व्यक्त करून शिक्षणपद्घतीची सविस्तर माहितीही त्यांनी बुक्कल यांच्याकडून जाणून घेतली. सुमारे तासभर बुक्कल व हजारे यांच्यात संवाद झाल्याचे अण्णांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी सांगितले.  
आपण केवळ अण्णांप्रति असलेल्या आस्थेपोटी त्यांच्या भेटीसाठी आलो आहोत. या भेटीमागे दुसरा कोणताही उद्देश नाही, असे बुक्कल यांनी सांगितले. हजारे यांची भेट घेतल्यानंतर राळेगणसिद्घीत राबविण्यात आलेल्या विविध योजनांची बुक्कल व त्यांच्या कुटुंबीयांनी पाहणी केली. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेले विविध प्रकल्प पाहून बुक्कल कुटुंबीय प्रभावित झाले. हरयाणातही अशाप्रकारचे प्रयोग राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा