ठाणे जिल्हा परिषदेच्या वेळुक केंद्रशाळेच्या अंतर्गत येणाऱ्या ११ शाळांचा शिक्षण महोत्सव नुकताच शिरोशी येथे पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रायोगिक शिक्षणाचे धडे देण्याची गरज आहे. यामुळे ही मुलेही शहरी भागातील मुलांप्रमाणे आपली कल्पकता सिद्ध करतील, असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. या कार्यक्रमाला पर्यावरणाचे अभ्यासक देठे, केंद्रप्रमुख गोपाळ सोनावळे उपस्थित होते.

Story img Loader