भोसला सैनिकी विद्यालयाचे अमृत महोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलन नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
प्रमुख पाहुण्यांनी संचलनाचे निरीक्षण, शाळेचे समादेशक कमांडंट एस. एस. सहरावत यांच्यासह केले. या प्रसंगी शाळेच्या अश्व पथकाने रोमहर्षक प्रात्यक्षिके केली. संस्थेचे अध्यक्ष आर. व्ही. देवी यांनी स्वागत केले. शाळेचे अध्यक्ष आशुतोष रहाळकर यांनी स्वसंरक्षण कला अवगत करण्यासाठी भोसला स्कूलने मुलींची सैनिकी शाळा सुरू केल्याचे सांगितले.
या  वर्षीचा आदर्श रामदंडी पुरस्कार शाळेचा विद्यार्थी कॅप्टन एन. किरुबाकर (१२ वी विज्ञान) याने पटकावला. त्यास महिंद्रा शिष्यवृत्ती ५०० रूपये, राज्यपालांची मानाची तलवार, चषक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी कार्यवाह दिवाकर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. ए. वाय. कुलकर्णी, उपप्राचार्य एस. आर. महाले हेही उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यालयाने पालक शिक्षक सभेचे आयोजन केले होते. विद्यालयाने विज्ञान, चित्रकला, हस्तकला, भूगोल, क्रीडा संरक्षणशास्त्र, इतिहास, संगणक या
विषयाची प्रदर्शने

भरविली होती. गणित तज्ज्ञ
व्ही. गोटखिंडीकर यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सूत्रसंचालन चेतना गौड व वर्षां शेजवळ यांनी केले. मुख्य प्रशिक्षण अधिकारी ए. आर. मुंढे व प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संचलनासाठी मार्गदर्शन केले.

ex-servicemen , nation building, Army Chief ,
माजी सैनिकांचा राष्ट्रनिर्मितीमध्ये सहभाग शक्य; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे मत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Eknath Shinde Shivsena Welcomes NCP Congress Leaders in Party
एकनाथ शिंदेंचा शरद पवार व काँग्रेसला दणका, नाशिकमधील मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’
Sharad Pawar appreciate Rss work , Sharad Pawar,
संघाच्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
loksatta chavadi political drama in Maharashtra
चावडी: भुजबळ तेव्हा आणि आता

नाईट हायस्कूलचे पारितोषिक वितरण

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या मराठी माध्यमातील नाईट हायस्कूलचे स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ जु. स. रुंगटा हायस्कूलच्या सभागृहात झाला.
या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व व्यावसायिक प्रकाश देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच वाचन संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखत तंत्राव्दारे त्यांनी मनोगत व्यक्त करताना आयुष्यात आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद याबद्दल विद्यार्थ्यांना उदाहरण देऊन पटवून दिले. त्यांच्या पत्नी व लेखिका वासंती देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षक दिलीप अहिरे यांनी पाहुण्यांची मुलाखत घेतली. सूत्रसंचालन राजेश कायस्थ यांनी केले.

वावरे महाविद्यालयात
स्त्रीभ्रूण हत्या विरोधी शिबीर
पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ आणि सिडको येथील वावरे महाविद्यालय यांच्या वतीने स्त्रीभ्रूण हत्या : लेक वाचवा, देश वाचवा’
हे शिबीर झाले. विविध महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी शिबीरात सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी प्रास्तविक केले. स्त्रीभ्रूण हत्या थांबविली पाहिजे, मुलींचे प्रमाण वाढविले पाहिजे या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
मविप्र संस्थेचे संचालक नाना महाले यांनी आज स्त्रीला दुय्यम स्थान नसले तरी तिच्या संरक्षणाचा प्रश्न आहेच. मुलींचा जन्म घेण्याचा हक्क कोणी हिरावू नये, असे ते म्हणाले. संस्थेचे चिटणीस सुनील ढिकले यांनी डॉक्टरी क्षेत्रातील अनुभव सांगितले.
समन्वयक डॉ. वेदश्री थिगळे यांनी स्त्री जीवनातील स्थित्यंतराची माहिती दिली. प्रत्येक परिवर्तनाच्या टप्प्यावर स्त्रीला किंमत मोजावी लागली आहे. परिवर्तन झेलण्यासाठी चौकटी सोडून वेळ प्रसंगी तिने अन्यायही सहन केला आहे. महिलांचा विकास व संरक्षणाच्या बाबतीत शासन जागृत आहे आणि राहील हा विश्वास बाळगू, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रथम सत्रात डॉ. कांचन देसले यांनी सौंदर्याचा जेवढा विचार करतात तेवढाच कणखरपणाही जपा, असा सल्ला मुलींना दिला. मुलींनी स्त्री शक्तीचा वापर करावा. विविध राज्यात स्त्रीभ्रूण हत्येसाठी कोणते प्रयत्न केले जातात त्याची माहिती दिली. प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी स्त्रीभ्रूण हत्येमुळे कुटुंब व्यवस्थेवर सामाजिक चालीरीती व परंपरेवर कोणते परिणाम होतात, त्या विषयी माहिती दिली.
द्वितीय सत्रात अ‍ॅड. मिलन खोहर यांनी महिलांविषयक कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. अन्याय व अत्याचार करणाऱ्यांविरूध्द कायद्यात असलेल्या शिक्षेचा परिचय करून दिला. मुलींच्या वक्तव्यावर विश्वास ठेवून आरोपींना शिक्षा द्यावी पण त्यातही गैरवापर होऊ शकतो. आज मुलींची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. डॉ. प्रविण गुजराथी यांनी स्त्रियांच्या आरोग्याची माहिती दिली. या वेळी ‘लेक वाचवा देश वाचवा’ या वरील चित्रफित दाखविण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. सरिता जाधव यांनी केले. आभार विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष प्रा. के. एम. खालकर यांनी मानले.

Story img Loader