भोसला सैनिकी विद्यालयाचे अमृत महोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलन नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
प्रमुख पाहुण्यांनी संचलनाचे निरीक्षण, शाळेचे समादेशक कमांडंट एस. एस. सहरावत यांच्यासह केले. या प्रसंगी शाळेच्या अश्व पथकाने रोमहर्षक प्रात्यक्षिके केली. संस्थेचे अध्यक्ष आर. व्ही. देवी यांनी स्वागत केले. शाळेचे अध्यक्ष आशुतोष रहाळकर यांनी स्वसंरक्षण कला अवगत करण्यासाठी भोसला स्कूलने मुलींची सैनिकी शाळा सुरू केल्याचे सांगितले.
या वर्षीचा आदर्श रामदंडी पुरस्कार शाळेचा विद्यार्थी कॅप्टन एन. किरुबाकर (१२ वी विज्ञान) याने पटकावला. त्यास महिंद्रा शिष्यवृत्ती ५०० रूपये, राज्यपालांची मानाची तलवार, चषक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी कार्यवाह दिवाकर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. ए. वाय. कुलकर्णी, उपप्राचार्य एस. आर. महाले हेही उपस्थित होते. स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विद्यालयाने पालक शिक्षक सभेचे आयोजन केले होते. विद्यालयाने विज्ञान, चित्रकला, हस्तकला, भूगोल, क्रीडा संरक्षणशास्त्र, इतिहास, संगणक या
विषयाची प्रदर्शने
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा