नाशिकमधील विद्यालयांमध्ये वार्षिक सोहळ्यांची धूम
बिटको गर्ल्स हायस्कूल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दि न्यू एज्युकेशन इन्स्टिटय़ूट संचलित येथील वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक क्रीडा पारितोषिक समारंभ आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अनुराधा डोणगावकर यांच्या उपस्थितीत झाला.
शाळा आपल्याबरोबर आयुष्यभर असते. हे आयुष्य पुन्हा मिळणार नसल्याने विद्यार्थी दशेतच आपण शाळेचे महत्व लक्षात घेऊन ध्येय निश्चित करावे, असा सल्ला डोणगावकरने दिला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ए. सी. साळी उपस्थित होते. शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी, उपमुख्याध्यपिका जयश्री पेंढारकर, उपमुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील धनश्री मिठसागर, विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील वैभवी मोहिते, आदिती काथवटे, राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेतील प्राजक्ता पाटील, सिकई मार्शल आर्टची पूजा शिंदे, निकिता भुजबळ, तायक्वांदोतील पल्लवी नाडे, नंदिनी नाडे, जिम्नॅस्टिकपटू शुभांगी नवसारे, ऋतिका परदेशी, किक बॉक्िंसगसाठी कविता दाहिजे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय स्तरावर आयोजित विविध क्रीडा प्रकारातील विजेत्यांना गौरविण्यात आले. सुत्रसंचालन रुपाली जोशी यांनी केले. वार्षिक प्राविण्य पारितोषिक वितरण समारंभाचेही आयोजन गायक संजय गिते यांच्या उपस्थितीत झाले. संस्थेचे बाबासाहेब वैशंपायन अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांना गौरविण्यात आले. उपमुख्याध्यापिका जयश्री पेंढारकर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी शाळेची माजी विद्यार्थिनी दुडगावची सरपंच अर्चना पगारे हिचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन माया अकोलकर यांनी केले.
सारडा कन्या विद्यामंदिर
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण अभिनेता चिन्मय उद्गीरकर यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष रमेश देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर उपस्थित होते.यावेळी चिन्मयची सदानंद जोशी यांनी प्रकट मुलाखत घेतली. शालेय जीवनापासून मला नाटक व अभिनय क्षेत्रात खूप रस होता. त्यात करिअर करण्याचे स्वप्न होते. ते आज पूर्ण झाल्याचे चिन्मयने सांगितले. ‘सुपरस्टार महाराष्ट्राचा’ आणि ‘स्वप्नांच्या पलिकडले’ या मालिकेपासून ‘श्यामचे वडिल’ हा चित्रपट हा आजवरचा अभिनय क्षेत्रातील प्रवास राहिला असल्याचे त्याने सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका सरोजिनी तारापूरकर उपस्थित होत्या. वेदांगी पंढरपूरकर, पर्यवेक्षिका कल्पना पवार याचे सहकार्य लाभले.
रचना विद्यालय
महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित रचना माध्यमिक विद्यालयाचा ४३ वा पारितोषिक वितरण समारंभ लेखक डॉ. सुनील कुमार लवटे यांच्या उपस्थितीत झाला. डॉ. लवटे यांनी स्वच्छंद समाजात वावरतांना माणुसकीचे संस्कार विसरू नका असे आवाहन केले. संस्थेचे सचिव सुधाकर साळी यांनी संस्थेचा चढता आलेख प्रास्ताविकातून मांडला. मुख्याध्यापिका मंगल धाडणकर यांनी शाळेची माहिती दिली. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी, सचिव सुधाकर साळी, सहसचिव शांताराम आहिरे आदी उपस्थित होते. सुखदा पांडे यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापिका सुचेता येवले यांनी आभार मानले.
सीडीओ मेरी शाळा
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी शाळेचा ३४ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गटशिक्षणाधिकारी महेंद्र भोये यांच्या उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी होते. यावेळी भामरे यांनी सर्वानी प्रत्येक विषयाचे ज्ञान मिळविण्यासाठी सखोल वाचन करावे, असे आवाहन केले. गणितातील गंमती जमती व शालेय जीवनातील अनुभव व्यक्त केले.
यावेळी रमेश नटाळ, पालक शिक्षक संघाचे प्रकाश बारी, संस्था सहकार्यवाह दिलीप अहिरे, मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका वसुंधरा अकोलकर, हर्षवर्धन गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. लिना चव्हाणने सूत्रसंचालन केले. आनंदा वाणी यांनीे आभार मानले.
पेठे विद्यालय
नाशिक येथील पेठे विद्यालयात ८९ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. स्नेहसंमेलनाचे प्रथम सत्रातील उद्घाटन मुख्याध्यापक रा. गो. हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यध्यापक ए. पो. कडाळे, पर्यवेक्षक यादव आगळे, लतिका पाटील, जया कासार उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षण पर्यवेक्षिका जया कासार, ज्येष्ठ शिक्षिका जान्हवी रोकडे यांनी केले. संमेलनाच्या दुसरे सत्र डॉ. उमेश माऊसकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन ओंकार बेंद्रे यांनी केले. आदित्य खांदवे याने आभार मानले.
उंटवाडी माध्यमिक विद्यालय
सिडकोतील उंटवाडी माध्यमिक विद्यालयाचा २५ वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा सुहास शुक्ल, माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी विद्यार्थी सुहास वराडे यांच्या उपस्थितीत झाला. शालेय समिती अध्यक्ष पां. म. अकोलकर अध्यक्षस्थानी होते. दरवर्षी खेळाडूंना १२ टी शर्ट देण्याची घोषणा त्यांनी केली. बोरस्ते यांनी दैनंदिन अभ्यास केला तर शाळेमध्ये मन रमते, असे सांगितले. मुख्याध्यापिका वीणा नवले यांनी प्रास्ताविक केले.
मान्यवरांचा परिचय क्रीडा शिक्षक मधुकर पगारे यांनी करून दिला. सुनंदा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.