न्यायालयाचा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दिलासा
शहरातील गुरू गोविंद सिंग अभियांत्रिकी तसेच क. का. वाघ महाविद्यालयात प्रथम वर्षांत प्रवेश घेण्यासाठी उच्च न्यायालयाने ‘जनरल चॉइस कोड’ दिल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येणार असल्याची माहिती गुरू गोविंद सिंग फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. जग्गी यांनी दिली.
अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह सर्वाना ‘एनएफआर चॉइस कोड’ शासनाच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फ्रीशिप व शिष्यवृत्ती देण्यास शासनाने नकार दिला होता. त्या विरोधात असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ प्रायव्हेट इंजिनीअरींग कॉलेजेसच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांपुढील समस्या दूर झाली आहे, अशा महाविद्यालयांमध्ये पंचवटीतील क. का. वाघ, अंजनेरीचे ब्रम्हा व्हॅली, येवला तालुक्यातील बाभूळगावचे एस. एन. डी, सिन्नर तालुक्यातील चिंचोलीचे सर विश्वेश्वरय्या, एकलहरेचे मातोश्री, नाशिकचे गोखले एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय, अंजनेरीचे सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या महाविद्यालयांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्याची मनसेची मागणी
प्रतिनिधी, नाशिक
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी रहिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांची गरज असून ती त्वरित मिळवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यंदा माध्यमिक शाळा तसेच दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण जयंती राजस्व अभियानअंतर्गत परीक्षा होण्यापूर्वीच पुढील शिक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व दाखले शाळांमध्ये देण्यात येतील, असे शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार लागणारे शुल्कही विद्यार्थ्यांकडून आकारण्यात आले. काही विद्यार्थ्यांना हे दाखले मिळाले असले तरी बहुसंख्य विद्यार्थी दाखल्यांपासून वंचित आहेत. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखेरची मुदत २५ जूनपर्यंत असून दाखले न मिळालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रवेशासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना दाखले त्वरित मिळण्याची व्यवस्था करावी, तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या सर्व प्रमाणपत्रांसाठीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष खंडेराव मेढे यांनी दिला आहे.
मुक्त विद्यापीठाच्या एम.एड. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
प्रतिनिधी, नाशिक
शहरातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.एड. शिक्षणक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
या शिक्षणक्रमाला प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ११ जुलै आहे. या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी शिक्षणशास्त्र विद्याशाखेची बी.एड. पदवी किमान ५५ टक्क्यांसह पूर्ण केलेली असावी. या पदवीनंतर किमान दोन वर्षे पूर्णवेळ नियमित सेवेचा अनुभव व सध्या सेवेत असणाऱ्यांनी तसेच बी.एड.नंतर अर्धवेळ सेवा असल्यास किमान चार वर्षे अनुभव व सेवेत असणारे विद्यार्थी या शिक्षणक्रमासाठी पात्र ठरतील.
अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राकडे संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.