रुंगटा विद्यालयात वर्षांरंभी गुढी
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जु. स. रुंगटा हायस्कूल येथे शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशी वर्षांरंभ उपासना घेण्यात आली. या प्रसंगी मंचावर मुख्याध्यापिका छाया वाणी, पर्यवेक्षक शिवाजी बोढारे, जयश्री यार्दी आदी उपस्थित होते. या वेळी गुढीही उभारण्यात आली. संस्कृत श्लोकपठण ज्योत्स्ना आव्हाड व नेहा सोमठाणकर यांनी केले. अर्थवाचन उषादेवी बैरागी व चारुशीला देवरे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन चंद्रभान कोटकर व संगीता मालपाठक यांनी केले.
कल्पेश मोरे ‘नीट’मध्ये जिल्ह्यात प्रथम
शहादा
वैद्यकीय प्रवेश पूर्वपात्रता परीक्षेत (नीट) तालुक्यातील लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचालित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कल्पेश मोरे ३४२ गुण मिळवून नंदुरबार जिल्ह्यात प्रथम आला. त्याने राज्य पातळीवरील गुणवत्ता यादीत ११६ वा क्रमांक पटकाविला आहे. या वर्षांपासून बारावीनंतरच्या वैद्यकीय प्रवेशासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या आदेशानुसार देशपातळीवर एकच सामाईक प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात आली. कल्पेशचा मोठा भाऊ प्रमोद यानेही एमएच-सीईटी परीक्षेत यश मिळविले होते. कल्पेश हा पुरुषोत्तमनगर येथील वाल्मीकी विद्यालयातील शिक्षक यशवंतराव रामदास मोरे यांचा मुलगा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा