राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यास प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी बठकीत ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी. व्ही. नीला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, डॉ. प्रकाश डाके, डॉ. चव्हाण, आशिष इंगळे आदी उपस्थित होते. आíथक व दुर्बल घटकांना दुर्धर, गंभीर आजारांवरील उपचार-शस्त्रक्रिया मोफत करून घेणे शक्य व्हावे, यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे. योजनेंतर्गत ९७२ आजारांवरील उपचार-शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. जिल्ह्यासाठी चिराऊ रुग्णालय, स्वाती क्रिटीकेअर, करीम रुग्णालय व जिल्हा रुग्णालयास योजनेसाठी संलग्नित केले आहे. जिल्ह्यासाठी ६ आरोग्यमित्र नेमले असून भविष्यात आणखी आरोग्यमित्र नेमण्यात येणार आहेत. एक लाख रुपयांच्या आत वार्षकि उत्पन्न असलेल्या कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी तालुकास्तरीय माहिती-शिक्षण-संवाद मोहीम राबविण्यात येणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही माहिती दिली जाणार आहे. मंगळवारी (दि. २६) तालुकास्तरीय आरोग्य मेळावा आयोजित केल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader