भातपिकाची बिनभरवशाची शेती करताना निसर्गाच्या कोपामुळे निराशाच्या गत्रेत सापडलेल्या शेतकऱ्यांना ग्राम चुटीया येथील ऋषी टेंभरे या तरुण अॅटोमोबाईल अभियंत्याने आशेचा किरण दाखविला आहे. शेती करण्याचा ध्यास घेऊन त्याने चार एकरात काकडीची लागवड केली. िठबक सिंचनाच्या सहायाने दोन महिन्यांत ८ लाख रुपयांचे उत्पादन घेतले.
ऋषी टेंभरेने चंद्रपुरातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर पुणे,मुंबई,चेन्नई च्या कंपनीतील कंपन्याच्या ऑफर आल्या परंतु, घरच्या पारंपरिक शेतीत त्याचे मन रमायचे. त्याने आधुनिक तंत्रज्ञानावर शेती करण्याचा निर्धार केला. तालुका कृषी विभागाशी सल्लामसलत केली. आपल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा फायदा शेती तंत्रज्ञानासाठी करून घेतला. चार एकर शेतीत काकडीचे उत्पादन घेण्याचे ठरविले. सुरूवातीला चांगली नांगरणी केली. सेंद्रिय खताचा छिडकाव केला. त्यावर निज्जा कंपनीची काकडीचे बियाणे डिसेंबर महिन्यात लावले. सात बाय सात अंतराचे वाफे तयार केलेत. तीन बाय चार अंतरावर काकडीचे बियाणे लावण्यात आले. पाण्याचा योग्य वापर करावा म्हणून िठबक सिंचनाचा उपयोग केला.
नव्या तंत्रज्ञानामुळे कमी पाण्यात चार एकरातील काकडीची शेती फुलली. वेलीला जागोजागी काकडयाही लागल्यात. सद्यस्थितीत काकडीचे पीक साडेतीन महिन्यांचे झाले असून त्याला यामधून ३० टन काकडीचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या दोन महिन्यातच त्याला आठ लाखांच्या काकडीचे उत्पादन झाले. दरदिवशी सरासरी २० ते २५ िक्वटल काकडीची तोड केली जात आहे. ऋषीला एकरी ५० हजारांचा खर्च आला. छोटयाशा चुटिया ग्राम गावातील काकडी गोंदिया, नागपूर, बालाघाट, जबलपूरच्या बाजारपेठेत जात आहे. त्याच्या काकडी उत्पादन तंत्राची माहिती करून घेण्यासाठी अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषीतज्ज्ञ, अभ्यासक आणि तरुण शेतकरी भेट देत आहेत. सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीतील काकडीची चवही चाखणारे ऋषीवर अभिनंदनाचा वर्षांव करीत आहेत. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्याला लाभ मिळावा, असे ऋषी धोरण असून यानंतर तो पपईचे पीक घेणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा